
जगातील सर्वात लांब अटल बोगद्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले
रोहतांग – जगातील सर्वात लांब अटल बोगद्याचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. रोहतांग पास इथं असलेला हा बोगदा समुद्र सपाटीपासून ३ हजार ६० मीटर उंचीवर आहे. हा बोगदा खुला झाल्यानं हिमाचल प्रदेशातील अनेक भाग जिथं बर्फवृष्टीच्या काळात वाहतूक ठप्प होते ती आता सुरू राहिल.
मनाली आणि लेहमधील अंतरही यामुळे जवळपास ५० किलोमीटरने कमी होणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या या बोगद्याची लांबी ९ किमी इतकी आहे. मनाली लेह हायवेवर रोहतांग, बारालचा, लुंगालाचा ला आणि तालंग ला यांसारखे पास आहेत पण बर्फवृष्टीच्या काळात इथून जाणं अशक्य होत होते
www.konkantoday.com