पत संस्था चे नियमन करण्यासाठीगठीत नियामकमंडळ सदस्यांची कालमर्यादा संपल्याने नियामकमंडळाचे काम ठप्प.,नव्या नियुक्त्यां तात्काळ करा :-अँड. दीपक पटवर्धन
पतसंस्थांच्या संदर्भाने धोरणात्मक निर्णय करणारे नियमक मंडळ सध्या अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती आहे. नियमक मंडळावर नियुक्त केलेल्या सदस्यांची मुदत संपली आहे.
नियुक्ती अभावी निर्णय खोळंबले
मात्र नव्याने नियमक मंडळ सदस्यांची नियुक्ती होण्याचे काम शासन स्तरावर गेले काही महिने प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक धोरणात्मक निर्णय, अर्थकारणातील बदलाशी सुसंगत निर्णय होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे पतसंस्था व्यवस्थेत खूप अडचणी निर्माण
झाल्या आहेत.
19 हजार पत संस्था 73 हजार कोटी च्या ठेवी प्रचंड व्याप्ती
नव्या आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक निर्णय नियमक मंडळ अस्तित्वात नसल्याने गेले काही महिने होऊ शकले नाहीत.
तेरा हजार पेक्षा जास्त संख्येने असणाऱ्या नागरिक ग्रामीण बिगर शेती पतसंस्था तसेच 6000 चे घरात असणाऱ्या पगारदार पतसंस्था या संस्थांमध्ये दोन कोटी 67 लाख नागरिकांनी केलेली गुंतवणूक 73 हजार कोटी पेक्षा जास्त आहे .45 हजार कोटींपेक्षा अधिक ची कर्जे या व्यवस्थेच्या माध्यमातून वितरित झालेली आहेत. इतकी व्याप्ती आणि निकटता असणाऱ्या या व्यवस्थे संदर्भाने इतक इतके अवदासीन्य खटकणारे आहे.
NPA ,CRAR , कर्जमार्यादा वाढ असे अनेक निर्णय प्रलंबित
नियामक मंडळ नसल्याने एनपीए संदर्भातील निर्णय, सी आर ए आर संदर्भातील वेटेजचे बदल, कर्ज मर्यादा वाढ इत्यादी अनेक निर्णय अडकून पडले आहेत. पतसंस्थांवर निर्बंध पतसंस्था विरुद्ध कारवाया यासाठी सजग असणारी यंत्रणा नियामक मंडळाच्या नियुक्ती बाबत इतकी उदासीन का? हा प्रश्न सतावत राहतो.
जनसामान्यांची चळवळ
पतसंस्था जनमानसात विश्वासार्ह गुंतवणुकीचे साधन आहे. कर्जासाठी पतसंस्था व्यवस्थेवर मोठा वर्ग अवलंबून आहे. गावोगावी खेडोपाड्यात शहरी भागात पतसंस्थेत संस्थांचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे पतसंस्थांच्या आर्थिक सेवांशी मोठा वर्ग जोडलेला आहे. अशा स्थितीत धोरणात्मक निर्णय घेणारे पतसंस्था व्यवस्थे संदर्भात आर्थिक तसेच तांत्रिक निर्णय करण्यासाठी नियामक मंडळ ही संकल्पना अस्तित्वात आली. मात्र अनेक महिने नियामक मंडळ अस्तित्वात नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे.
तात्काळ नियुक्त्या कराव्यात
शासनाने तात्काळ नियामक मंडळ सदस्यांची नियुक्ती मंडळावर करावी व नियामक मंडळ गठीत करावे. पतसंस्था संदर्भातील अनेक मुद्द्यावर निर्णय तात्काळ व्हावेत अशी मागणी अँड. दीपक पटवर्धन कार्याध्यक्ष राज्य पत संस्था फेडरेशन यांनी करून एका गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे.
www.konkantoday.com