चिपळूण शहरात सीएनजी पंपावर चाकरमान्यांचे हाल


सीएनजी पंपावर गॅसचा तुटवडा असल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. वाहनामध्ये सीएनजी भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. यामुळे गणेशभक्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सीएनजी पंपावर परजिल्ह्यातील वाहनांची गर्दी केल्याने त्याचा फटका स्थानिक वाहन धारकांनाही बसत आहे.
अलिकडे अनेक वाहने सीएनजीवर करण्यात आली आहेत. गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणेकर चाकरमानी आपली वाहने घेवून गावात दाखल होतात. मात्र चिपळुणात सध्या सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे. शहरालगत वालोपे, बहाद्दूरशेख चौक, शिवाजीनगर एसटी स्थानक या ठिकाणी एकूण तीन सीएनजी पंप आहेत. सार्डेमध्ये देखील एक पंप आहे. मात्र सध्या सीएनजीचा पुरवठा कमी पडत असून निदान गणेशोत्सवासाठी मध्यवर्ती असणार्‍या चिपळूणमध्ये सीएनजीचा पुरवठा चोरीस तास हवा. म्हणजे चाकरमान्यांना रांगा लावून प्रतीक्षा करावी लागणार नाही. सद्यस्थितीत सीएनजी पंपावर वाहनांच्या रांगा पहायला मिळत आहेत. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीत अडकलेले चाकरमानी पुन्हा सीएनजीसाठी खोळंबत आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button