रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा नाका येथेगांजा बाळगणार्या तरूणाला अटक
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा नाका येथे गांजा बाळगणार्या तरूणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. रविवारी रात्री १० च्या सुमारास पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. महंमद ताहीर इब्राहीम मस्तान (रा. मिरकरवाडा रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
१७ सप्टेंबर २०२३ रोजी मिरकरवाडा नाका येथे महंमद मस्तान हा तरूण संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या पथकाला आढळून आले. यावेळी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडील १ निळ्या रंगाची पिशवी पोलिसांच्या निदर्शनास आले. हा गांजा सुमारे ७०० ग्रॅम असून त्याची बाजार किंमत अंदाजे १४ हजार रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
www.konkantoday.com