तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू


सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेल्या सुफियान दिलदार शेख (वय 23) रा. साकेडी मुस्लिमवाडी कणकवली या युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.सुफियान याचा मृतदेह बुधवारी सकाळी वायारी जाधववाडी समुद्रकिनारी सापडून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकेडी मुस्लिमवाडी कणकवली येथील शावेझ रियाझ शेख व चुलत भाऊ सुफियान दिलदार शेख तसेच झेद अब्दुल्ला शेख, मतीन हारूण शेख, अरबाज इम्तियाझ शेख रा. साकेडी मुस्लिमवाडी कणकवली आणि शहीद इरफान शेख, साहिल इरफान शेख, उस्मान हनिफ काझी, कतिल नाझीम काझी, युसूफ मुस्ताक काझी सर्व रा. मुस्लिम वाडी हुमरठ ता. कणकवली आणि मतीन याचा मित्र मेहबूब बाबु नदाफ सध्या रा. नलावडे चाळ शिवाजी नगर कणकवली असे एकूण 11 जण मंगळवारी सायंकाळी मालवण समुद्र किनारी फिरण्यासाठी मोटारसायकलने तारकर्ली पर्यटन केंद्र येथे आले होते.

सायंकाळी ते समुद्र किनारी हॉलि्बॉल खेळत होतो. त्यावेळी सुफियान शेख व अरबाज शेख समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. काही वेळात साहिल शेख याने आरडा ओरडा करून समुद्रात उतरलेले दोघेही पाण्यात वाहून जात असल्याचे सांगितले. सर्व त्या दिशेने गेलो मतीन शेख, उस्मान काझी त्या दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. अरबाज शेख याला पाण्यातून बाहेर काढले. त्यावेळी मतीन हा ही बुडू लागला मात्र पाण्याच्या लाटेत किनाऱ्यावर फेकला गेल्याने बचावला. मात्र सुफियान हा समुद्राच्या पाण्यात आत वाहून गेला. त्याचा शोध सुरु होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button