जिओ एअर फायबर लाँच ,बेसिक प्लॅन 599 रुपयांपासून, सध्या फक्त मोठ्या शहरांपुरतं

0
57

जिओने गणेश चतुर्थीचं औचित्य साधून जिओ एअर फायबर लाँच केलं आहे. यामध्ये यूजर्सना 1 GBPS एवढा जबरदस्त स्पीड मिळणार आहे. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी याची 28 ऑगस्टला घोषणा केली होती.तेव्हापासूनच यूजर्स याची प्रतिक्षा करत होते.
जिओचं हे नवं हॉटस्पॉट डिव्हाईस आहे. याच्या मदतीने घरात किंवा ऑफिसमध्ये वायरसेल 5G इंटरनेट मिळणं शक्य होणार आहे. हे एक प्लग अँड प्ले डिव्हाईस आहे. इतर इंटरनेट राउटर प्रमाणेच हे यूज करता येईल. अर्थात, हे पूर्णपणे वायरलेस असणार आहे.रिलायन्स जिओ एअर फायबर सेटअप करण्यासाठी यूजर्सना जिओच्या अ‍ॅपची गरज भासणार आहे. हे डिव्हाईस 100 स्क्वेअर फूट एरियामध्ये हाय स्पीड वायरलेस इंटरनेट देईल. याचा बेसिक प्लॅन 599 रुपयांपासून सुरू होणार आहे. तर यातील सगळ्यात महागडा प्लॅन 3,999 रुपयांचा आहे.जिओ एअर फायबरमध्ये 1Gbps पर्यंतचा टॉप इंटरनेट स्पीड, अनलिमिटेड डेटा आणि काही ओटीटी प्लॅन्सचं सबस्क्रिप्शन मिळतं. 599 रुपयांच्या बेसिक प्लॅनमध्ये 30 Mbps टॉप स्पीड मिळतो. तसंच, अनलिमिटेड डेटा डिज्नी+ हॉटस्टार, सोनी लिव्ह आणि झी5 यांसह 11 ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो. हा एअर फायबर प्लॅन सहा किंवा 12 महिन्यांसाठी घेऊ शकता.जिओ एअर फायबरची किंमत अद्याप कंपनीने घोषित केलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार याची किंमत सुमारे सहा हजार रुपये असण्याची शक्यता आहे. हे सध्या मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये लाँच करण्यात आलं आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here