
ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आला नववर्ष स्वागतयात्रेचा शुभारंभ
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे ह्यांनी राज्य पूर्णपणे कोरोना निर्बंधमुक्त केल्यामुळे सुमारे २ वर्षानंतर आज रत्नागिरी मध्ये गुढीपाडव्यानिमित्त स्वागतयात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. ह्या स्वागतयात्रेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. स्वागतयात्रेमध्ये रत्नागिरीतील विविध सामाजिक संस्था, धार्मिक संस्था तसेच पक्षभेद विसरून सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. ना. उदय सामंत देखील उत्साहाने ह्या स्वागतयात्रेमध्ये सहभागी झाले असतानाच ना. उदय सामंत ह्यांना ढोल वाजविण्याचा मोह आवरला नाही आणि ना. उदय सामंत ह्यांनी आपली मंत्रिपदाची कवचकुंडले बाजूला ठेवत ह्या स्वागतयात्रेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे ढोल वाजवून नववर्षाचे स्वागत केले. स्वागतयात्रेमध्ये ना. उदय सामंत ह्यांच्यासोबत राजापूर चे आमदार राजन साळवी, भैरी देवस्थान चे अध्यक्ष मुन्ना शेठ सुर्वे तसेच भैरी देवस्थान चे सर्व ट्रस्टी सहभागी झाले होते.
