सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपतीची आरास करतानाविजेचा धक्का लागूनएकाचा मृत्यू
गणपतीची आरास करताना विजेचा धक्का लागून सरमळे-देऊळवाडी येथील एकाचा मृत्यू झाला. रमाकांत शिवराम परब (वय ५०) असे त्यांचे नाव आहे.
ही घटना काल सकाळी ९ वाजता घडली. गणेश चतुर्थीच्या तोंडावरच त्यांच्या अकाली मृत्यूमुळे परब कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की कोकणात सध्या गणेश चतुर्थीच्या तयारीची लगबग सुरू आहे. रमाकांत परब हे कालसकाळी घरात गणपतीची आरास करत होते. टेबलवर उभे राहून ते वायरिंग करत होते. त्यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागला. त्यामुळे ते तोल जाऊन खाली कोसळले. त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्यांना मृत घोषित केले. रमाकांत परब हे खासगी आराम बसमध्ये वाहक होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी बांदा आरोग्य केंद्रात धाव घेतली. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com