राज्यातील सरकारी शाळा खासगी कंपन्यांना (काॅर्पोरेटला) दत्तक देऊ नका-बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांची मागणी
राज्यातील सरकारी शाळा खासगी कंपन्यांना (काॅर्पोरेटला) दत्तक देऊ नका,अशी मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व अजित पवार तसेच शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील सरकारी शाळा कॉर्पोरेट ला दत्तक देणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिनांक ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षण विभागाकडून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार कार्यक्रमात मुंबई येथे केली आहे. राज्यात ६२ हजार सरकारी शाळा आहेत. शाळा दत्तक देण्याच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वाक्षरी केली आहे.या शाळा दत्तक देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सकारात्मक प्रस्ताव मुख्यमंत्रीकडे सादर केला असून त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे
सध्या शाळा व महाविद्यालये चालवून पैसे कमावणे हा व्यवसाय झाला आहे. सरकारी शाळा खासगी कंपन्यांना दिल्यानंतर शिक्षण शासनाच्या बांधिलकीत राहणार नाही.कोणीही कुठेही शिक्षणाचा व्यवसाय सुरू करेल व पालकांकडून मनासारखी शिक्षणाची फी घेऊन पैसे उकडेल.परिणामी सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील.
www.konkantoday.com