
लाेकानाआठ दिवसांचा अल्टीमेटम मात्र राजकीय नेत्यांना नियमांत सूट?
राज्यात एकीकडे पुन्हा एकदा करोना संकट डोकं वर काढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसाठी पुढील आठ दिवसांचा अल्टीमेटम दिली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात राहावी यासाठी राज्य सरकार अनेक कठोर पावलं उचलताना दिसत आहे. दुसरीकडे पुण्यात कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले आणि नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करण्यात आलं. विशेष म्हणजे या लग्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली.
www.konkantoday.com