
कोकणात मध्यम हलक्या स्वरुपात पाऊस बरसेल, हवामान खात्याचा अंदाज
राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसानं पुनरागमन केल्याचं पाहायाला मिळालं आहे. रखडलेली शेतीची कामं पुन्हा नव्यानं आणि वेगानं सुरु झाल्यामुळं बळीराजाचा उत्साहसुद्धा शिगेला पोहोचला आहेत्यातच गणेशोत्सवाची लगबगही सुरुच आहे. त्यामुळं परतलेला हा पाऊस आणखी खास ठरत आहे. नव्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाचा जोर समाधानकारक असेल. राज्याच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण जास्त असेल तर, कोकणात तो मध्यम ते हलक्या स्वरुपात बरसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
www.konkantoday.com