खेड शहरात बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून घरातील १३ लाख ८४ हजाराच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला

0
18

खेड शहरात चोरीच्या घटना घडत असून घरफोडी चे प्रमाण देखील वाढले आहे रविवारी खेड शहरातील कौचाली पटेल मोहल्ला येथील बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून घरातील १३ लाख ८४ हजाराच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारत चोरून नेले ही घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उघड झालीया प्रकरणी वसीम कुतुबुद्दीन ढेणकर यांनी येथील तक्रार दाखल केली आहे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मामाचे राहते घर १६ ते १७ सप्टेंबर या कालावधीत बंद होते याचाच फायदा चोरट्याने उठवून घराच्या दर्शनी बाजूकडील कुलूप तोडत आत मध्ये प्रवेश केला व घराच्या कपाटातील सुमारे १३ लाख ८४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले या घटनेनंतर खेड शहरात एकच खळबळ उडाली आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here