
धक्कादायक!चिपळूण शहरातील भोगाळे परिसरात एका नर्सवर अतिप्रसंग ,संशयित आरोपीच्या शोधात पोलीस
चिपळूण शहरातील भोगाळे परिसरात एका नर्सवर अतिप्रसंग करण्याचा धक्कादायक घटना घडली त्यामुळे खळबळ उडाली आहे .गुरुवारी सायंकाळी भोगाळे परिसरात हा प्रकार घडला. शहरातील भोगाळे येथे एस.टी. महामंडळाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ही घटना घडली. या जागेत अतिक्रमण हटाव मोहिमेत हटविण्यात आलेले खोके व हातगाड्या ठेवण्यात आल्या आहेत. हा भाग चारही बाजूंनी हातगाड्या व खोक्यांनी वेढलेला असल्याने संबंधित नराधमाने त्याचा फायदा उठवला.
संबंधित तरुणी बाजारपेठेतील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असून, ती रात्रपाळीसाठी मध्यवर्ती बसस्थानकात उतरली.त्यानंतर भोगाळे येथून चिंचनाक्याच्या दिशेने चालत जात असताना मागून येऊन संबंधित संशयिताने तिला ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्यावेळी तिने विरोध केला त्यांत ती जखमी झाली
या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला असून अत्याचारित महिला एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तपासासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.पोलीस आरोपीच्या शोधात आहेत
www.konkantoday.com