शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना अधिक दर्जेदार व सुरक्षित सेवा देण्याकरिता सर्वांनी प्रयत्न वाढवावे – जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ . संघमित्रा फुले
जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने रुग्णालयात कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णाला जास्तीत जास्त दर्जेदार आणि सुरक्षित सेवा देण्याकरिता आपले प्रयत्न वाढवावे जेणेकरून रुग्णांना चांगली सेवा मिळेल आणि रुग्ण लवकर बरा होणार, अशा सूचना डॉ. फुले मॅडम यांनी दिल्यात. या ठिकाणी रुग्ण सुरक्षेबाबत ची प्रतिज्ञा घेण्यात आली. या ठिकाणी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. विकास कुमरे, निवासी वैद्यकीय अधिकारी , डॉ. अंकुश शिरसाट, डॉ. सुतार, डॉ. कांबळे, डॉ . प्रसादे, तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.konkantoday.com