‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत कलश यात्रापालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पाली परिसरातील माती अमृत कलशात प्राप्त
*रत्नागिरी, दि.१७ – रत्नागिरी तालुक्यातील पाली ग्रामपंचायती अंतर्गत महसुली गावांतून अमृत कलश यात्रा आज पार पडली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पाली ग्रामपंचायतीने परिसरातील माती अमृत कलशात प्राप्त केली.
यावेळी आर डी सामंत, किरणभैय्या सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, ग्राम पंचायत उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई आदीसह सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रत्येक गावातून एकत्रित अमृत कलशाचा तालुकास्तरावर एकच अमृत कलश बनवून असे ९ कलश ग्रामीण भागातून व शहरी भागातून एक कलश दिल्ली येथे १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून रवाना होणार आहे.
www.konkantoday.com