
त्या 14 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले नव्हते तर तो स्वतःहून घरातून निघून गेला होता
दापोली तालुक्यातील टाळसूरे बौद्धवाडी येथून रूपेश खैरे हा चौदा वर्षाचा मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानक येथे १३ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आली होती.सदर गुन्ह्याचा शोध दापोली पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव, पोकाॅ सुहास पाटील ,पोकॉ विरेंद्र सातर्डेकर यानी शिताफिने घेऊन १६ सप्टेंबर रोजी ठाणे येथून हरवलेल्या रूपेशला शोधून आणला.पोलीस तपास्त त्याचे अपहरण झाले नव्हते तर तो स्वतःहून घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले आहे.
रूपेशला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती दापोली पोलीस सूत्रांनी दिली.
www.konkantoday.com