
आमदार शेखर निकम यांची राज्याच्या कृषी शिक्षणाचे धोरण निश्चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये निवड
महाराष्ट्र शासनातर्फे राज्याच्या कृषी शिक्षणाचे धोरण निश्चित करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. एस ऐन पुरी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती निर्माण करण्यात आली असून यामध्ये चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर गोविंदराव निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणिउपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या सूचनेनुसार डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील, प्रतिभा सुरेश धानोरकर आणि शेखर निकम या तीन आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निकम यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे
www.konkantoday.com