शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर राज्यातील सर्व गटप्रवर्तक महिला व आशा उग्र आंदोलन करणार
राज्यभर आंदोलन
महाराष्ट्र शासनाने पंधरा दिवसात आशा सुपरवायझरबद्दल दिलेल्या आश्वासनानुसार कार्यवाही न केलेल्या राज्यातील सर्व गटप्रवर्तक महिला व आशा यांच्यासह राज्यभर उग्र आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र आशा सुपरवायझर्स कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने देण्यात आला आहे.
मानधन देण्यात होत असलेल्या अन्यायकारक भूमिकेविरोधात संयुक्त कृती समितीने मुंबईतील आझाद मैदानात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात राज्यातील ३ हजार आशांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रत्नागितील सुमारे ५० हून अधिक आशा, स्वयंसेविका उपस्थित होत्या. संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक सुभाष बोरकर यांना निवेदन दिले. www.konkantoday.com