रेल्वेचा गोंधळ आणि प्रवाशांची विनाकारण जीवघेणी धावपळ
गणेशोत्सव काही दिवसावर आल्याने कोकणातील चाकरमानीगावाकडे येण्यासाठी रेल्वे मध्ये गर्दी करीत आहेत
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर अनेक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. सीएसएमटी या स्थानकावरून १५ सप्टेंबर रोजी शुक्रवारी दुपारी १२ वाजता सीएसएमटी सावंतवाडी ही स्पेशल ट्रेन पनवेल रेल्वे स्थानकात दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान आली. यानंतर एसी आणि स्लीपर कोचच्या डब्यांमध्ये अचानक बदल केला गेला. ट्रेन अवघ्या तीन मिनिटात सुटल्याने अनेक कुटुंबांची तारांबळ उडाली. त्यामुळे अक्षरशः चैन खेचून ट्रेन थांबवण्याची वेळ प्रवाशांवर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.धक्कादायक प्रकाराची तक्रार या ट्रेनमधून प्रवास करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील नरेश नाईक यांनी रेल्वे प्रशासनाकडे तात्काळ केली आहे. ट्रेन सुटण्यासाठी लावलेली ट्रेनच्या बोगी व्यवस्था आणि ट्रेन पनवेल स्थानकात आल्यावरती बदलण्यात आली बोगी यामध्ये करण्यात आलेला बदल याची कोणतीही कल्पना स्थानकावरून करून घेण्यात आली नाही, असा या रेल्वे प्रवाशांचा आरोप आहे. या सगळ्या गोंधळात लगेच ट्रेन सुटली. यावेळी माझ्या मुलीला मी कसतरी ट्रेनमध्ये चढवलं पण जशी ट्रेन वेग धरू लागली, मग मात्र मी माझ्या मुलीसाठी हातातलं सामान टाकून ट्रेनमध्ये चढलो. माझी आई आणि पत्नी ह्या बाकीच्या सामना सकट ट्रेनमागे धावत होत्या.हा असा प्रसंग माझ्या एकट्यावरच नाही तर बऱ्याच लोकांसोबत होत होता. कारण डब्यांची व्यवस्था न कळल्यामुळे बहुतेक जण ट्रेनच्या बाहेरच राहिले होते. ट्रेन सुटते आहे, हे बघून प्लॅटफॉर्मवरची माणसं ज्यांना ट्रेनमध्ये चढायचे होते ते प्रवासी चैन खेचा म्हणून ओरडत होती. ट्रेन मधल्या काही सुज्ञ लोकांनी ट्रेनची चैन खेचली. ट्रेन थांबली आणि लोकांना ट्रेन मध्ये चढायला मिळाले.
त्यामुळे या प्रकारची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या प्रवाशांनी केली आहे. मध्य रेल्वे स्थानकावरच्या पनवेल रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे हा सगळा प्रकार घडला होता. इंडिकेशन्स एरर आली होती. संबंधित कर्मचाऱ्याला योग्य ती समज देऊन त्याचे योग्य ते समुपदेशन करण्यात आले आहे, तसेच या कर्मचाऱ्यावर असलेल्या सुपरवायझरला ही योग्य ती सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे इथून पुढे अशी कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे
www.konkantoday.com