कोकणातुन कोल्हापूरला जोडणारा आणखी एक नवा घाटमार्ग निर्माण होणार
राजापूर तालुक्यातील अणुस्कूरा घाट हा पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जवळचा मार्ग म्हणून ओळखला जातो. आता राजापूर तालुक्यातुन पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी आणखी एका नवीन मार्गची भर पडणार आहे. राज्य सरकारच्या यावर्षी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राजापूर व कोल्हापूर याना जोडणाऱ्या काजिर्डा घाटरस्त्याच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून त्यानंतर त्याचा आराखडा तयार करून आता हे कामाची निविदा प्रक्रीया सुरु झाल्याची माहीती पुढे आली आहे.
भविष्यात या घाटाची पुर्तता होऊन हा मार्ग सुरू झाल्यास कोकणातुन कोल्हापूरला जोडणारा आणखी एक नवा घाटमार्ग निर्माण होणार आहे.
जुलै २१ मध्ये कोकणात झालेल्या अतीवृष्टीत कुंभार्ली, आंबा, अणुस्कूरा घाटांत दरडी कोसळुन कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राशी दळणवळणाचा संपर्क काही काळ बंद पडला होता. त्या पार्श्वभूमीवर कोकणातुन पश्चिम महाराष्ट्राला कोल्हापूरला जोडणारा एखादा भक्कम आणि तेवढाच महत्वपूर्ण घाट असणे किती गरजेचे आहे हे अधोरेखित झाले होते .आणि त्या दृष्टीने काजिर्डा घाट रस्त्याचा मुद्दा जोरकसपणे पुढे आला होता.
दरम्यान अणुस्कुरा घाटाच्या खोदकामाला आरंभ झाला आणि काजिर्डा मार्गे घाट रस्त्याचे काम मागे पडले ते कायमचेच. नंतर अणुस्कुरा घाटासह गगनबावडा घाटांना महत्व प्राप्त झाल्याने काजिर्डा घाट मार्ग विजनवासात गेला. नंतरच्या कालखंडात काजिर्डा गावात मोठा लघु पाटबंधारे प्रकल्प मंजुर झाला आणि त्याचे काम देखील सुरु झाले होते. तथापी अनेक मुद्द्यांवरुन स्थानिक जनतेतुन संघर्षाची भुमिका राहिल्याने तो प्रकल्प देखील रखडलेल्या आहे.
www.konkantoday.com