राजापूर तालुक्यात उपळे-तळेखाजन-प्रिंदावण येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका
राजापूर तालुक्यात उपळे-तळेखाजन-प्रिंदावण येथे फासकीत अडकलेल्या बिबटयाला फासकीतुन सुखरूप बाहेर काढत वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे. या बिबटयाला वनविभागाच्या वतीने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.तशी माहीती राजापूर वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सदरचा बिबटया ही बिबटयाची मादी होती
राजापूर तालुक्यातील मौजे उपळे, उपळे-तळे खाजन-प्रिंदावण येथे रस्त्याच्या डाव्या बाजुला फासकीत एक बिबट्या अडकल्याची माहिती उपळेचे रहीवाशी व पंचायत समितीचे माजी सभापती कमलाकर कदम यांनी गुरूवारी सकाळी राजापूर वनविभागाला दिली. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जावून पाहणी केली असता, उपळे-तळे खाजन-प्रिंदावन रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्यालगत फासकीत मादी जातीचा बिबट्या अडकल्याचे दिसले. तात्काळ वनविभागाने या बिबटयाला सुखरूप बाहेर काढले
सदर रेस्क्यू परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी प्रियंका लगड, राजापूर वनपाल सदानंद घाटगे, लांजा वनपाल दिलीप आरेकर, पाली वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक लांजा सुरज तेली, वनरक्षक कोर्ले श्रीमती श्रावणी पवार, तसेच रेस्क्यू टिमचे दिपक चव्हाण, प्रथमेश म्हादये, निलेश म्हादये, विजय म्हादये आदींनी ही कामगिरी पार पडली
www.konkantoday.com