१ जून हा एसटीचा वर्धापन दिन सर्वसामान्य जनतेचे हक्काचे प्रवास साधन लालपरी आज ७६ वर्षांची झाली.

पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस १ जून १९४८ रोजी धावली. त्या निमित्ताने १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. वर्धापन दिनानिमित्त सर्व बसस्थानके रांगोळी काढून, फुला-पानांचे तोरणे बांधून सजविण्यात येणार आहेत.एसटीची सेवा राज्यात देण्यासाठी ८७ हजार कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत. ३६ बेडफोर्ड बसवर सुरू झालेला हा प्रवास ७६ वर्षांत १५ हजार बसपर्यंत पोहोचला आहे. बसच्या माध्यमातून ५६० पेक्षा जास्त बस स्थानकावरून दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते.७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी अशा ३० पेक्षा जास्त समाज घटकांना एसटीच्या प्रवासीसेवेमध्ये ३३ टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. शालेय सहली, लग्न समारंभ, विविध शासकीय महोत्सव, मेळावे यासाठीही एसटी सेवा देत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button