
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनाधिकाऱ्यांकडून जीवदान
पाचल,दिवाळवाडीतील बलवंत सुतार यांच्या विहीरीत पडलेल्या पाच वर्षीय बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक जनतेच्या सहकार्याने सुखरुप बाहेर काढले सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या विहीरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला भक्षाचा पाठलाग करताना घेतलेली झेप चुकली व बिबट्या विहीरीत पडला . नर जातीतील तो बिबट्या असल्याची माहिती राजापुरच्या वनपाल श्रीमती राजश्री कीर यान्नी दिली .