मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली


मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे. मुसळधार पावसामुळे येथे एक चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरल्याचे वृत्त आहे. या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर होतेडिजिसीएने दिलेल्या माहितीनुसार, VSR Ventures Learjet 45 विमान मुंबई विमानतळावर धावपट्टी 27 वर लँडिंग करताना धावपट्टीवर कोसळलं.या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. डीजीसीएने सांगितले की, हे चार्टर्ड विमान लँडिंग करत असताना मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील दृश्यमानता 700 मीटर होती. अपघातानंतर काही वेळातच पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व 8 जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान दुर्घटना काल संध्याकाळी 5 वाजल्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर दोन्ही धावपट्टी काही काळ बंद करण्यात आली होती. संध्याकाळी 6.47 च्या सुमारास एका धावपट्टीवर ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यात आले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button