आगामी निवडणुकीच्या मतावर डोळा ठेवून कोकणातील चाकरमान्यांना खुश करण्यासाठी राजकीय मंडळींची चढाओढ
आगामी निवडणुकीच्या मतावर डोळा ठेवून कोकणातील चाकरमान्यांना खुश करण्यासाठी राजकीय मंडळींची चढाओढ सुरू आहे
लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव म्हणजे कोकणी माणसाचा जीव की प्राण. कोकणी चाकरमान्यांची पावलं वळतात ती गावच्या लाल मातीकडं. सहा महिने आधीच गणपतीचं बुकिंग सुरू होतं.मात्र, अवघ्या काही सेकंदात कोकण रेल्वेची तिकीटं फुल्ल झाल्यानं कोकणी माणसाच्या पदरी पडते ती निराशा. मग एसटी किंवा खासगी ट्रॅव्हल्सच्या बसगाड्यांचा पर्याय शोधला जातो. मात्र ट्रॅव्हल्सचे रेट या काळात गगनाला भिडतात. कोकणी माणसाचा हाच वीक पॉईंट राजकीय पक्षांनी बरोबर हेरलाय. त्यामुळंच गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात गावी जाणा-या चाकरमान्यांसाठी राजकीय नेत्यांकडून फुकट प्रवासाची सोय करून दिली जाते. अर्थातच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी ही सगळी मतांची बेगमी असते.
यंदाच्या वर्षी मुंबई भाजपकडून कोकणात जाण्यासाठी 300 खासगी बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. त्याशिवाय मुंबईहून 2 मोदी एक्स्प्रेस ट्रेन आणि 4 कोकण स्पेशल ट्रेन सोडल्या जाणार आहेत. त्याशिवाय शिवसेना शिंदे गटाकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 12 ते 18 खासगी बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com