मुंबई भाजपतर्फेकोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 6 ट्रेन आणि 338 एसटी आणि खाजगी मोफत उपलब्ध-आमदार आशिष शेलार
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुश करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत
मुंबई भाजपतर्फे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ट्रेन आणि एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे श्री गणेशाचे जोरदार स्वागत करण्यासाठी मुंबई भाजपाची टीम तयार झाली आहे. याही वर्षी गतवर्षी प्रमाणे मुंबईचा मोरया ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 6 ट्रेन आणि 338 एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज (दि. १३) पत्रकार परिषदेत दिली.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यावेळी मुंबई भाजपतर्फे 1 तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यातर्फे 1 आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितशे राणे यांच्यातर्फे 2 (मोदी एक्सप्रेस) अशा 4 रेल्वे गाड्यांचे पूर्ण नियोजन झाले आहे. अजून 2 गाड्या प्रस्तावीत असून एकूण 6 रेल्वे गाड्यांची सुविधा कोकणवासीयांना करण्यात आली आहे. 15 तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
तर मुंबई भाजपतर्फे कोकणातील चाकरमान्यांसाठी 256 एसटी बसची मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही नगरसेवकांनी आपापल्या विभागात खाजगी बसच्या सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अंधेरी येथून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यातर्फे 51 बस सोडण्यात येत आहेत. वांद्रे पश्चिम येथून ही 31 एसटी बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अलिबाग अशा कोकणातील सर्व गावापर्यंत 338 हून अधिक बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
www.konkantoday.com