बँकेने बेकायदेशीर घराचा ताबा घेतल्याने गोठ्यात राहणाऱ्या टेंभे येथील मनोहर खाडे यांना महाराष्ट्र लोकाधिकार समितीने मिळवून दिले हक्काचे घर
रत्नागिरी शहराजवळील टेंभे येथील मनोहर खाडे, यांचे टेंभे येथील स्वतःच्या मालकीचे घर,बँक ऑफ इंडिया रत्नागिरी शाखे ने शेतीकर्जासाठी बेकायदेशीर रित्या ताब्यात घेऊन सील केले होते, वास्तविक बँकेचे पैसे वेळेत भरून देखील खाडे यांच्यावर अन्याय झाला होता त्यामुळे मनोहर खाडे हे गरीब शेतकरी कुटुंब तब्बल 14 महिने घराच्या बाहेर आपल्या गोठ्यामध्ये वास्तव्य करत होते, हे या गावातील मानकरी कुटूंब असून या १४ महीनेयात कुटुंबाने सर्व सण उत्सव गोठ्यातच साजरे केले होते, ही गोष्ट तेथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या रत्नागिरी येथील पदाधिकारी यांच्या कानावर घातली,त्यामुळे लगेचच महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या रत्नागिरी पदाधिकाऱ्यांनी खाडे यांचा यावर्षीचा गणेशोत्सव त्यांच्या घरातच साजरा झाला पाहिजे,यासाठी सामाजिक जाणीवेतुन महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍड.प्रसाद करंदीकर यांच्या उपस्थितीत ‘ घर वापसी आंदोलन’ केले.
महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे सर्व पदाधिकारी यांच्यासमवेत ऍड.प्रसाद करंदीकर व घर मालक मनोहर खाडे यांनी कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. प्रसाद करंदीकर, जिल्हाध्यक्ष अनंत शिंदे, मोसिन खाटीक नंदकुमार लोखंडे,कार्यध्यक्ष योगेश वाघमारे,नंदकुमार मोहिते साहेब, मुन्ना साळवी, सादीक डोंगरकर , संतोष तोस्कर . भाटकर सर तसेच महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे सर्व पदाधिकारी तसेच अनेक स्थानिक गावकरी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
www.konkantoday.com