राजापुरातील बारसू तेल शुद्धीकरण कामास वेग येणार ,प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन

0
37

महाराष्ट्रातील विविध कारणामुळे गाजत असलेल्या राजापुरातील बारसू तेल शुद्धीकरण कामास वेग येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यात सोमवारी यासंदर्भात सहमती झाली.
सुमारे 4 लाख कोटींच्या या प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाली आहे आहे, असं पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले. हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे.
रत्नागिरी प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाली आहे आहे, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे. बैठकीत हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली. आगामी वर्षात सौदीर अरेबिया भारतात 8.20 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या राजकुमार सलमान यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here