
दापोलीत घरोघरी दागिने पाॅलीश करून देणारे भामटे सक्रिय,नागरिकांची होतेय फसवणूक
दापोली:- संमोहीत करून गळ्यातील दागिने मागून दागिने पाॅलीश करताना सोन उतरवणारे भामटे दापोलीत फिरत आहेत. आज दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गिम्हवणे येथे एक भामटा एका घरी सोने पाॅलीश करून देतो असे सांगून गेला. त्यानी दागिने पाॅलीश करून दिले पैसे घेतले आणि तो निघून गेला. त्यानंतर शंका आल्याने आज संध्याकाळी सदर व्यक्ती समर्थ ज्वेलर्स येथे तो पाॅलीश केलेला दागिना तपासयला गेली. ती वस्तू तपासली असता मूळ वजनात लक्षणीय घट झालेली लक्षात आली.
ही वस्तू अनोळखी इसमाने पाॅलीश करताना काही ग्रॅम सोने पाॅलीशच्या नावाखाली लंपास केले. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याबाबत माहितगारानी सांगितले की यांनी सांगितले की घरी दागिने पाॅलिश करून देणारे आल्यास त्याना दागिने देऊ नयेत.पाॅलिशसाठीचे जे द्राव्य वापरतात त्यातून सोने अल्प स्वरूपात उदा.2/3 ग्रॅम विरघळवून घेतले जाते.त्यामुळे फसवणूक लगेच लक्षात येत नाही.मात्र कोणत्याही विश्वासहार्य पेढीत दागिने आणून तपासले असता मूळ वजन व पाॅलिश नंतर केलेले वजन यात फरक लक्षात येतो.सध्या सणासुदिचे दिवस असल्याने असे भामटे सक्रिय झाले असून कोणीही दागिने पाॅलीश करणारे घरी आल्यास त्यांना दागिने देऊ नयेत, शक्य झाल्यास बोलण्यात गुंगवून ठेऊन पोलीसांना त्वरीत कळवावे असे आवाहन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com