
चिपळूण नाट्यगृहातील खुर्च्यांची अखेर दुरूस्ती.
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील तुटलेल्या ८ खुर्च्यांची अखेर नगर परिषदेने दुरूस्ती केली आहे. याच्या खर्चासाठी तिन्ही कार्यक्रमांच्या आयोजकांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. त्यानुसारच दुरूस्तीचा खर्च करण्यात आला.काही दिवसांपूर्वी नाट्यगृहात एकाच दिवशी एका समाजाचा मेळावा, सामाजिक संघटनेचा गीतांचा कार्यक्रम व रात्री जाखडीनृत्य असे तीन कार्यक्रम झाले. त्यानंतर दुसर्या दिवशी नाट्यगृहातील ८ खुर्च्या मोडल्याचे तसेच अस्वच्छताही झाल्याचे दिसून आले. त्यामुळे नगर परिषदेने याची जबाबदारी एकाच कार्यक्रमावर न ठेवता तिन्ही कार्यक्रमांच्या आयोजकांची प्रत्येकी ५ हजार रुपयांची अनामत रक्कम जप्त करून त्यातून दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला. मात्र रंगकर्मी व नाट्य परिषदेने याबाबत मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन देवून हा प्रकार जाखडीनृत्यावेळी झाला असावा असा संशय व्यक्त करीत यापुढे जाखडीसह अन्य कार्यक्रमांसाठी स्वतंत्र नियमावली ठेवण्याची मागणी केली. www.konkantoday.com