राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीची तारीख आणि वेळ ठरली आहे.
येत्या १४ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात याप्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमका काय निर्णय होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी नेमकी कधी होणार? असा प्रश्न वारंवार विचारण्यात येत होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाणून बुजून या प्रकरणावर सुनावणी घेण्यास विलंब करत असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून केला जात होता.
दुसरीकडे कायदेशीर बाबी आणि आमदारांकडून लेखी उत्तर मागितल्यानंतरच या प्रकरणाची सुनावणी सुरू होईल, असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं होतं. यासाठी राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांना कायदेशीर नोटीस बजावून लेखी उत्तर मागितलं होतं.
शिंदे गटाकडून तब्बल ६ हजार पानांचं उत्तर सादर करण्यात आलं. विधिमंडळात या कागपत्रांची पडताळणी केल्यानंतर आता या प्रकरणाच्या सुनावणीला १४ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.
www.konkantoday.com
Home राष्ट्रीय बातम्या शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीची तारीख आणि वेळ ठरली