मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा खड्ड्यांची चाळण
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना मुंबई-गोवा महामार्गावर गेल्याच आठवड्यात बुजविलेले खड्डे पुन्हा पावसाने उखडले असून पुन्हा एकदा महामार्गाची चाळण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या दौर्यावेळी महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवस पडणार्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा बुजलेले खड्डे उखडलेले आहेत. खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले असून गणेशोत्सव तोंडावर आला असताना महामार्गावर पडलेले खड्डे हा चिंतेचा विषय ठरला आहे.
www.konkantoday.com