बरं सुनक काय बोलले ते तुम्हाला कळलं का? की नुसतं चमकोगिरी करण्यासाठी फोटो काढला- उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टिपणी

0
75

विद्यमान मुख्यमंत्री जे सर्वात लोकप्रिय असल्याचा दावा करतात, तर दुसरे माजी मुख्यमंत्री जे कोरोना काळात केलेल्या कामामुळे जगात प्रसिद्ध असल्याचे म्हटले जाते. तर या माजी मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांच्यासोबतच्या फोटोची खिल्ली उडवली आहेराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी-२० परिषदेच्या समारोपासाठी राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्यावतीने आयोजित मेजवानीला हजेरी लावली. याच स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे समोरासमोर आले. या भेटीच्या छायाचित्राची सगळीकडे चर्चा होतांना दिसते आहे. त्याहीपेक्षा जास्त चर्चा होतेयं ती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या फोटोवर केलेल्या टिप्पणीची.जळगाव येथील एका कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी ठाकरे यांच्या या फोटोचा संदर्भ देत ऋषी सुनक यांच्याबरोबर फोटो तर काढला, पण त्यांच्याशी काय बोललातं ? कोणत्या भाषेत बोलला, काय बोलला तेही कळू द्या. बरं सुनक काय बोलले ते तुम्हाला कळलं का? की नुसतं चमकोगिरी करण्यासाठी फोटो काढला, अशा शब्दात शिंदेंची खिल्ली उडवली.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली होती. सत्ता तर गेली, पण शिंदेंमुळे शिवसेना नाव, पक्ष आणि चिन्हही हातचे गेले. त्यामुळे ठाकरे यांचा त्यांच्यावर राग असणे सहाजिक आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूका पाहता ठाकरे यांनी शिंदे यांना निशाणा केल्याचे त्यांच्या अलीकडच्या भाषणातून दिसून आले
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here