एसटी कामगार आक्रमक, सोमवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण
वेतनवाढ, महागाई भत्त्याबरोबरच आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगार आक्रमक झाले असून सोमवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास बुधवारपासून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन केले जाणार असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने स्पष्ट केले आहे.त्यामुळे एसटीची चाके पुन्हा थांबण्याची भीती व्यक्त होत आहे.
एसटी कामगारांसोबत झालेल्या करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना महागाई भत्ता देण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो, मात्र एसटी कामगारांना 34 टक्के दिला जात असून त्यामध्ये शुक्रवारी चार टक्क्यांची वाढ केली असली तरीही तो कमीच आहे.
www.konkantoday.com