ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी कशेडी घाटातील बोगद्यातून प्रवास करून केली पाहणी
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा लहान वाहनांसाठी खुला करण्यात येत असून त्यामुळे गणपती सणासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कोकणाचे सुपुत्र आणि ठाण्याचे लोकप्रिय आमदार संजय केळकर यांनी कशेडी घाट बोगदा व रस्त्याची आज पाहणी करुन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली मा.बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदार संजय केळकर यांना स्वतः टनेल मधून प्रवास करायला सांगितल्याने त्यानी स्वतःच्या गाडीने या बोगद्यातून प्रवासाची सुरुवात करुन कोकणच्या चाकरमान्यांना व कोकणातील जनतेला हा बोगदा वरदान ठरेल असे सुतोवाचक केले
मुंबई कडून गोव्याच्या दिशेने जाताना या बोगद्यातील एक लेन ११ सप्टेंबर पासून सुरू केली जाणार आहे. या बोगदाचे प्रवेशद्वार हे तिरंग्याने रंगवण्यात आल आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूला रत्नागिरी आणि रायगड पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आठवडाभरापूर्वी घेतलेल्या बैठकीत योग्य ते निर्देश महामार्ग प्रशासनाला दिले आहेत.
कशेडी बोगद्यातून केवळ हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू केली जाणार आहे. मुंबईतून कोकणात जाताना आता कशेडी घाटातील अवघड वळणांचा प्रवास टळणार आहे. त्यामुळे आता कशेडी घाटातून प्रवासासाठी लागणारा चाळीस मिनिटांचा वेळ आता केवळ आठ ते दहा मिनिटांवर येणार आहे. मुंबईतून कोकणात आणि गोव्यात जाताना या मार्गिकेचा वापर करता येणार आहे.
www.konkantoday.com