परशुराम घाटात डोंगराच्या बाजूकडील मातीचा भाग खाली आला, मात्र वाहतूक सुरू
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या परशुराम घाटात डोंगराच्या बाजूकडील मातीचा भाग काही खाली आल्याने एकेरी वाहतूक सुरू सुरू आहे. ही माती हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अलीकडेच परशुराम घाटातील तो कठीण कातळ फोडण्यात ठेकेदाराला यश आलं होतं त्यानंतर चौपदरीकरणातील दुसरी मार्गिका सुरू करण्यासाठी गतीने काम सुरू आहे. अशातच आता पुन्हा एकदा परशुराम घाटात माती खाली आल्याने या घाटाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
गेले दोन ते तीन दिवस कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे डोंगराकडील मातीचा काही भाग हा महामार्गावर आला आला आहे. अगदीच काही दिवसांवर आलेला गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक मार्गिका सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत
www.konkantoday.com