
एलपीजीनंतर आता पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारकडून सातत्याने पावले उचलली जात आहेत.अशा स्थितीत एलपीजीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन तिमाहीपासून तेल कंपन्या नफा कमावत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना लाभ देण्याचा विचार केला जात आहे.यासंदर्भात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणाले की, सरकारने नुकतीच एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात हा लाभ जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्यास वाव आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किमतीत कपात होऊ शकते. दुसरीकडे, पेट्रोल पंप डीलर्सची बैठक 9 सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी होणार आहे.
www.konkantoday.com