फणसकिंग’ मिथिलेश देसाई यांच्या जॅक फ्रुट ऑफ इंडिया या कंपनीचा लंडनमधील कंपनीशी करार
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील मिथिलेश देसाई यांची फणस किंग म्हणून ओळख आहे. त्यांच्या जॅक फ्रुट ऑफ इंडिया या कंपनीचा लंडनमधील सर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हब (CIH)या कंपनीसोबत सर्क्युलर इकॉनॉमी इकोसिस्टमला चालना देण्यासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार झाला आहे. याचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील एक हजाराहून अधिक शेतकर्यांना फायदा होणार आहे. भारतामध्ये वर्तुळाकार अर्थव्यवस्था इकोसिस्टम विकसित करण्याच्या उद्देशाने हा करार झाला आहे. भारताचा जॅकफ्रूट किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिथिलेश देसाई यांच्यावर भारतासाठी CIH च्या ब्रँड अॅम्बेसेडर (राजदूत) ची जबाबदारी ह्या कराराद्वारे देण्यात आली आहे. त्यांनी शाश्वत कृषी पद्धतींना चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवन उन्नत करण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्प्याची घोषणा केली आहे. मिथिलेश देसाई यांनी जगभरातील 86 वैविध्यपूर्ण फणस वाणांचे जोपासणा केली आहे. त्यांच्या या विलक्षण कामगिरीमुळं त्यांना जागतिक मान्यता मिळाली आहे. त्यांना नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने ‘कृषी गौरव पुरस्कार’, दिला आहे
www.konkantoday.com