
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आर्य अजय शिंदे याने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत मिळविले यश
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जांभरुण नं.१ चा विद्यार्थी आर्य अजय शिंदे याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत यश मिळवून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लावला आहे.आर्य अजय शिंदे हा इ५वीत असताना शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत आला होता.आता त्याने या निबंध स्पर्धेत यश मिळवल्याने सरपंच श्री.गौतम सावंत उपसरपंच श्री.मंदार थेराडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अजित सावंत आणि मुख्याध्यापिका श्रीम. रजनी मोहिते यांनी त्याचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
आर्य हा शाळेतील गुणी विद्यार्थी असून त्याला गणित,इंग्रजी,चित्रकला आणि खेळातही विशेष रुची आहे.गतवर्षी झालेल्या भास्कराचार्य परिक्षेत केंद्रातही उत्तम यश संपादन केले होते. गतवर्षीच्या विज्ञान प्रदर्शन मेळाव्यातही त्याने शाळेचे नेतृत्व केले होते.तो शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेतही तो सातत्याने यश मिळवतो.शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी एक दिवस अध्यापनाचे कामकाज केले त्यावेळीही त्याचा तीन आदर्श विद्यार्थी शिक्षकांत त्याचा पहिला क्रमांक आला होता. अशा या गुणवान विद्यार्थ्यांचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे. www.konkantoday.com