
लाखो रुपये खर्चुन बांधण्यात आलेले राजापुरातील विश्रामगृह अद्याप बंदच
राजापूर नगरपरिषदेच्या विश्रामगृहामधून राजापूरचे दिवाणी न्यायालय स्व-मालकीच्या जागेत स्थलांतरित झाल्यानंतर विश्रामगृहाची इमारत पुन्हा एकदा अनेक वर्षे विनापरवाना पडून आहे. राजापूर नगरपरिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले विश्रामगृह बंद स्थितीत असल्याने त्याचा मूळ उद्देश असफल ठरत आहे.शहरातील जकातनाक्यालगत विश्रामगृहाची अत्यंत चांगल्या पद्धतीची इमारत बांधण्यात आली आहे. एकूण तीन सूट या विश्रामगृहात निर्माण करण्यात आले आहेत. www.konkantoday.com