
ग्रामपंचायतीचा कर भरला नाही म्हणून कशेडी बोगदा कंत्राटदाराच्या कार्यालयाना भोगावं ग्रामपंचायतीने ठोकले कुलूप
गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाण्यासाठी मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाट बोगद्यातून एकेरी वाहतुकीसाठी हालचाली सुरू असताना या बोगद्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले आहे.
भोगाव ग्रामपंचायतीचा कर थकविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या बोगद्यातून वाहतूक होणार का, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, बोगद्याचे काम करीत असलेल्या शिंदे डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या तीन कार्यालयांना भोगाव ग्रामपंचायतीने टाळे ठोकले आहे. भोगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियांका कदम, माजी सरपंच राकेश उतेकर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेविका यांनी शिंदे डेव्हलपर्स कंपनी कार्यालयात जाऊन ही कारवाई केली.
www.konkantoday.com