
गणपतीपुळे येथीलभक्त निवासात १०० बेडच विलगिकरण केंद्र
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर करोना रुग्ण वाढत आहेत रत्नागिरी जवळील गणपतीपुळे देवस्थान व त्या भागातील चार ग्रामपंचायतींनी मिळून गणपतीपुळे भक्त निवासस्थानात शंभर बेडचे विलगीकरण केंद्र सुरू केले आहे
मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या अधिपत्याखाली असलेले मालगुंड, गणपतीपुळे, निवेंडी,भगवतीनगर या चार गावाच्या ग्रामपंचायती यांनी गणपतीपुळे देवस्थान चे भक्त निवास या ठिकाणी हे १०० बेड चे कोविड सेंटर काल सुरू झाले
याबाबत बोलतान डॉ विवेक भिडे यांनी सांगितले की स्त्रियांना ४० बेड ,पुरुष ४० बेड व २० बेड राखीव असे १०० बेड चे हे सेंटर आहे.
या मध्ये लक्षणे नसलेली पण कोविड पोजिटिव्ह असणारे रुग्ण ठेवले जाणार आहेत.
देवस्थान च्या मार्फत बेड, गाद्या, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र यावर नियंत्रण ठेवणार आहे.
www.konkantoday.com