मराठा आरक्षणासाठी महिलांनी स्वत:ला गळ्यापर्यंत जमिनीत गाडून घेतलं
मराठा आंदोलनासाठी एकीकडे 11 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठींबा मिळत असून राज्यात जागोजागी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहे. अशातच बीड मधील वासनवाडी या गावात चार महिलांनी स्वत:ला गळ्यापर्यंत जमिनीत गाडून घेत आंदोलन केले आहे.
वासनवाडी या गावातील या चार महिलांनी मराठा आरक्षणासाठी स्वत:ला जमिनीत गाडून घेतले होते. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
www.konkantoday.com