अशैक्षणिक कामासाठी समितीचे गठन, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा
अशैक्षणिक कामासाठी समिती स्थापन व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने १९ ऑगस्ट रोजी शासनाला पाठवलेल्या निवेदनातून केली होती. त्यावर एका समितीची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्य शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुंबई येथे केली.पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस हरीश ससनकर यांनी अशैक्षणिक कामासाठी समिती स्थापन व्हावी ही मागणी यासाठीच केली होती की यानिमित्ताने शासनाला समजले पाहिजे की शिक्षकांच्या मागे अशैक्षणिक कामे आहेत व ती पुष्कळ आहेत, आजवर प्रशासन शिक्षकांच्या मागे अशैक्षणिक कामे आहेत हेच मानायला तयार नव्हते. इतकेच काय तर नुकतेच सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम सुद्धा शैक्षणिक आहे, असेच आदेश देण्यात आले होते. या समितीच्या गठनामुळे शिक्षकांच्या मागे चिकटलेली सर्व अशैक्षणिक कामे पुढे येतील, शासनाच्या कागदावर येतील व समाजाला सुद्धा समजेल तसेच त्यावर कृती होऊन ती कमी होण्याची आशावाद शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com