परशुराम घाटातील” तो” अडथळा दूर करण्यासाठी नऊ महिने लागले


परशुराम घाटातील तो अडथळा दूर करण्यासाठी
कंत्राटदार कंपनीला नऊ महिने सातत्याने प्रयत्न करावे लागले
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित परशुराम घाटातील अतिशय कठीण कातळ फोडण्यासाठी तब्बल नऊ महिन्याचा कालावधी लागला आता कातळ पूर्णपणे फोडण्यात यश आल्यानंतर तेथे रखडलेल्या दुसऱ्या लेनच्या काँक्रिटीकरणाचे काम तातडीने सुरु केले आहे.आता परशुराम घाट ते आरवली दरम्यानच्या ३६ किलोमीटर अंतरात केवळ सव्वा किलोमीटरचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे. गणेशोत्सवापूर्वी उर्वरित काम मार्गी लागल्यास चिपळूण हद्दीत महामार्गावरील प्रवास सुसाट होणार आहे.
घाटातील चिपळूण हद्दीतील इगल इन्फ्रा कंपनीने याआधीच काम पूर्ण केले. परंतु, खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनी मार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन अनेक दिवस थांबले होते. याठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला होता. मात्र, आता कातळ फोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या दुसऱ्या लेनचे काम देखील वेगाने सुरु झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button