बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे शिक्षक दिन साजरा..
शिक्षक दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्र, गोवा क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने, क्षेत्रिय व्यवस्थापक श्री सुजित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गोगटे महाविद्यालय,रत्नागिरी येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्रचे उप क्षेत्रिय व्यवस्थापक श्री आनंद डिंगणकर यांच्या हस्ते गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री कुलकर्णी सर,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दामले सर आणि इतर प्राध्यापकांचा सन्मान श्री डिंगणकर यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र गोगटे कॉलेज शाखेचे व्यवस्थापक श्री राजेश कुमार,मुख्य प्रबंधक श्री कुंभार सर,बँक ऑफ महाराष्ट्र विकास अधिकारी श्री मुकेश गाथे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्री आनंद डिंगणकर यांनी शिक्षकांप्रती आदरभाव आणि कृतज्ञता भावना व्यक्त केली.समाजाच्या आणि देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे आवर्जून नमूद केले. महाविद्यालयातर्फे घेतले जाणारे विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याबाबतीत मोलाचे सहकार्य करण्याचे आश्वासनही याप्रसंगी त्यांनी दिले. बँक ऑफ महाराष्ट्र गोवा विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री सुजित कुमार यांनी याप्रसंगी दूरध्वनीद्वारे प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या.प्राचार्य कुलकर्णी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र च्या वतीने दिली जाणारी सेवा आणि सहकार्य याबद्दल समाधान व्यक्त केले.
www.konkantoday.com