एक जिल्हा एक उत्पादन” या कार्यशाळेचे राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्तेउद्घाटन
महाराष्ट्र उद्योग संचालनालय तर्फे आयोजित “एक जिल्हा एक उत्पादन” या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील उत्पादन या कार्यशाळेत पाहायला मिळणार आहे. आपल्या राज्यातील विविध उत्पादनाचे ब्रॅण्डिंग परदेशात चांगल्या प्रकारे करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य विभागामार्फत केले जाईल अशी ग्वाही यानिमित्ताने मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिली. यावेळी दक्षिण आफ्रिका कौन्सिल जनरल आंद्रिया कुन,प्रधान सचिव हर्षदीप कांबळे,विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह,अतिरिक्त विकास आयुक्त शन्मुखराजन एस. सुप्रिया देवस्थळे तसेच उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.konkantoday.com