राजापूर कनेर येथील डॉक्टरचे अपहरण करून दहा लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोल्हापूर परिसरातील टोळीला शाहूपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या


अँटी करप्शनचे नवी दिल्ली येथील युनिटचे अधिकारी असल्याचे भासवून रत्नागिरी जिल्ह्यातील कनेर येथील डॉक्टरचे अपहरण करून दहा लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोल्हापूर परिसरातील टोळीला शाहूपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.सुयोग सुरेश कार्वेकर (वय 38 रा. सावकार गल्ली, इंद्रायणीनगरजवळ, मोरेवाडी, ता. करवीर) रवींद्र आबासाहेब पाटील (वय 42, रा. पाटाकडील गल्ली, वाशी नाका, ता. करवीर) सुमित विष्णू घोडके (वय 33, रा. प्रगतीनगर, ता. करवीर) अशी अटक केलेल्या तोतयाची नावे आहेत.
कसबा बावडा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयालगत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळ सापळा रचून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय कुमार शंकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संशयितांकडून आलिशान मोटार, बनावट ओळखपत्र, भारत सरकार व गोरमेंट ऑफ इंडिया अशा अक्षराची पाटीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. फिर्यादी डॉक्टर सुभाष अण्णाप्पा डाक (वय 55, रा. कनेरी, ता. राजापूर) हे कणेरी येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. मुख्य संशयित रवींद्र पाटीलसह तिघे संशयित रविवार सकाळी त्यांच्या रुग्णालयात गेले होते.
आम्ही कोल्हापूर व नवी दिल्ली येथील अँटी करप्शन ब्रांच अधिकारी आहोत, असे भासवून तुम्ही बेकायदा गर्भलिंग चाचणी करून दरमहा दहा लाख रुपयांची कमाई करतात, अशी कोल्हापूर येथील युनिटला लेखी तक्रार आली आहे. त्यामुळे तुम्हाला कोल्हापूरला आमच्या सोबत यावे लागेल, असे सांगून त्यांना मोटारीत बसविले. तसेच त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायाची कागदपत्रांची मागणी केली. हे प्रकरण मॅनेज करायचे असेल, तर तुम्हाला १० लाख रुपये द्यावे लागतील, असेही त्यांनी धमकविले.
त्यानंतर सायंकाळी सात वाजता डॉक्टर डाक यांना कसबा बावडा येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या पार्किंगजवळ नेऊन थांबवले. डॉक्टर डाके यांनी कोल्हापूर येथील काही नातेवाईक आणि वकिलाशी मोबाईलवर संपर्क साधला. तसेच तातडीची सेवा देणाऱ्या 112 क्रमांकावर संपर्क साधताच काही वेळात पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकरसह त्यांचे पथक दाखल झाले. शिंदकर यांनी भामट्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांचा भांडाफोड झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button