रत्नागिरीच्या कलाकारांनी बनविलेला ”साऱ्या खुणा”म्युझिक व्हिडिओ; खिडकी प्रॉडक्शनतर्फे प्रदर्शित
कोकणात कलाकारांची कमी नाही फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनुभव घेतलेल्या कोकणी कलाकारांनी खिडकी प्रॉडक्शन सुरू केले.आता त्यावर स्थानिक कलाकारांनी एकत्र येत बनवलेला ”साऱ्या खुणा” हा मराठी गीतांचा म्युझिक व्हिडिओ अल्बम यू ट्यूब चॅनेलला प्रदर्शित होणार आहे. यात रहस्यमय प्रेमकथा गाण्यातून मांडली आहे. गीतकार, संगीतकार रत्नागिरीचेच आहेत. हा व्हिडिओ २ सप्टेंबरला १५० हून अधिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे.
रत्नागिरीचा सुपुत्र, अभिनेता गीतकार, निर्माता स्वानंद श्रीकांत देसाई आहे. गीताला गायक स्वप्नील बांदोडकरने वेगळ्याच उंचीवर नेले आहे.
राधिका भिडे हिने इनर व्हॉईस स्टुडिओद्वारे संगीत संयोजन केले आहे. संकेत कोरलेकर, ऐश्वर्या सुर्वे यांनी अभिनय केला असून, ऐश्वर्या कलाक्षेत्रात पदार्पण करणार आहे. पटकथा व दिग्दर्शन वृषभ पांचाळ याचे आहे. त्याने काश्मीर फाईल्स या चित्रपटात सहसंकलक म्हणून काम पाहिले आहे. चित्रीकरण वैनतेय जोशी, सहाय्यक छायाचित्रकार दत्तराज कुवळेकर, कला दिग्दर्शन रोहित नागले, बेस गिटारवादन शैलेश गोवेकर, मेकअप् मनिष नित्सुरे, सहदिग्दर्शक वल्लभ शिंदे, वेशभूषा प्राजक्ता लिंगायत, सहाय्यक कला दिग्दर्शक प्रतीक राजवाडे, केशभूषा प्रियांका संसारे, निर्मिती व्यवस्थापन सम्यक हातखंबेकर, व्हीएफक्स जयश्री ठोकल, मेकिंग अजिंक्य रणदिवे, पोस्टर डिझायनिंग जय कुंभारे, पोस्ट प्रॉडक्शन अजय चव्हाण यांनी जबाबदारी पेलली आहे.
”साऱ्या खुणा” हे गाणं सावरकर नाट्यगृह, आदिष्टी शिरगाव, शिरगावातील आठवले यांचे घर, काळबादेवी, शीळ धरण येथील परिसरात चित्रित केल गेले आहे
www.konkantoday.com