सूर्याकडे झेप घेण्यासाठी ‘आदित्य’ सज्ज; काही तासांमध्ये होणार प्रक्षेपण


चंद्रयान ३ चंद्रावर यशस्वीरित्या उतरले आणि बहुतांश मोहिमही फत्ते झाली आता इस्रोने सूर्य मिशन सुरु केले आहे. आज पीएसएलव्ही एक्सएल रॉकेटद्वारे आदित्य एल-१ लाँच केले जाणार आहे.यानंतर ठीक १२७ दिवसांनी हे यान पॉईंट एल१ ला पोहोचणार आहे. तिथून ते सुर्याबाबत पृथ्वीवर डेटा पाठविण्यास सुरुवात करणार आहे. परंतू, या मोहिमेत एक मोठी रिस्क आहे, यानाचा वेग नियंत्रित करता नाही आल्यास ते थेट सुर्याकडे जात नष्ट होणार आहे.
आदित्य एल-1 मिशन लाँच करण्याची तयारी सुरू आहे. ही मोहीम 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित केली जाईल. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या एक टक्का अंतर कापून आदित्य एल-१ या अवकाशयानाला एल-१ बिंदूवर घेऊन जाईल. L1 हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का म्हणजे 15 लाख किलोमीटर आहे.
पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेर जाताना पकडलेला वेग जर कमी करण्यात यश आले तरच ही मोहिम यशस्वी होणार आहे. आदित्य-एल1 हे हॅलो ऑर्बिटमध्ये सोडले जाईल. L1 बिंदू सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित आहे. सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत ते फक्त 1 टक्के आहे. या प्रवासात 127 दिवस लागणार आहेत.
पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीने आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट खेचते. यामुळे पहिली अवघड कक्षा म्हणजे पृथ्वीच्या SOI च्या बाहेर जाणे आहे. क्रूज फेज आणि हॅलो ऑर्बिटमध्ये L1 पोझिशन पकडावी लागणार आहे. इथे वेग नियंत्रणात आणला नाही तर यान सुर्याकडे खेचले जाईल आणि जळून नष्ट होण्याचा धोका आहे याची सर्व काळजी शास्त्रज्ञांनी घेतली आहे त्यामुळे ही मोहीम भारताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button